नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत करा

जिल्हाधिकार्‍यांकडे शेकापची मागणी
। बीड । प्रतिनिधी ।
आठ दिवसांपासून सातत्याने बीड जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे हाता तोंडाशी आलेली पिके पूर्ण पाण्यात गेली आहेत. मध्यंतरी पाऊस नसल्यामुळे तर पीक गेली होते, त्यातून वाचलेली थोडेफार आलेल्या पिकांचे आज जास्त पावसाने खूप नुकसान झाले आहे, शेतकर्‍यांच्या गुराढोरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकर्‍यांना तात्काळ मदत करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंधारे पाझर तलाव फुटून जमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत. मागील वर्षी पीक विमा शेतकर्‍यांना मिळाला नसल्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी यावर्षी पीक विमा भरला नाही, त्यामुळे शेतकर्‍यांचे पीक पंचनामे करून सरसकट तात्काळ 50 हजार रुपयांची मदत आठ दिवसांत करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री, कृषीमंत्री, विभागीय आयुक्त, पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. तात्काळ मदत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई मोहन गुंड अ‍ॅड संग्राम तुपे दत्ता प्रभाळे अर्जुन सोनवणे भिमराव कुटे,यांनी दिला आहे,

Exit mobile version