दिव्यांग क्रिकेटपटूंना मदत

। पनवेल । वार्ताहर ।

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाने सिंधुदुर्गातील दिव्यांग क्रिकेटपटूंना मदतीचा हात दिला आहे. दरम्यान, राष्ट्रीय दिव्यांग महिला क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्गातुन महाराष्ट्राच्या संघात निवडण्यात आलेल्या दिव्यांग खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे पनवेल स्टेशनवर स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मंडळाच्या सदस्या संध्या मिराशी यांनी दिवंगत जेष्ठ सदस्य सूर्यकांत मिराशी यांच्या स्मरणार्थ भोपाळ येथे क्रिकेट सामने खेळण्यासाठी जाणार्‍या या खेळाडूंना प्रवास खर्चासाठी 15 हजार रुपये दिले होते, सोबत त्यांना मंडळाच्या सदस्यांतर्फे भेट वस्तू देण्यात आल्या. पनवेल स्टेशनवर खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी मनोहर मराळ, दीपक तावडे, प्रदीप रावले, बाबाजी नेरुरकर, प्रसन्न कुमार घागरे, मंगेश सावंत, स्वप्ना राणे तसेच इनरव्हीलच्या अध्यक्षा शुभदा भगत, सचिव शुभांगी बहिरा ही सर्व मंडळी जमली होती.

Exit mobile version