| पनवेल | वार्ताहर |
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेलतर्फे महिला दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. महिला दिनी महिला सदस्यांना आपल्या घरी पुन्हा वापरणे योग्य जुने कपडे व्यवस्थित धुवून घडी करून द्यावे अथवा भेट आलेल्या पण आपण वापरत नसलेल्या नवीन साड्यादेखील चालतील, त्या दि.5 मार्चपर्यंत आपल्या ऑफिसमध्ये द्याव्या. सदर कपडे आदिवासी पाड्यावर वाटप केले जातील किंवा त्याचा पुनर्वापर करता येईल अशा संस्थांना सुपूर्द केल्या जातील. यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे करण्यात आले आहे. यासाठी शॉप नं. 17, गेहलोत रेसिडेन्सी, सेक्टर-1 ड, नवीन पनवेल या ठिकाणी संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत प्रिया खोबरेकर (9322645693), प्रिता भोजने (9969391352) यांच्याशी संपर्क साधावा.