| पनवेल | वार्ताहर |
शहर पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. करंजाडे, सेक्टर- 6 या परिसरामध्ये काही बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती पनवेल पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी पोलीस गेले असता मोकळ्या मैदानामध्ये एका झोपडीमध्ये दोन पुरुष दिसून आले. त्यांनी त्यांची नावे मोहम्मद राकिब अब्दुल रजाक आणि तरीकुल हरीस उदिन अशी सांगितली. त्यांच्याकडे कोणतीही वैध प्रवासी कागदपत्रे सापडून आली नाहीत.