| पनवेल | वार्ताहर |
खारघर शहरात सेक्टर -12 साई मंदिराजवळील केंद्रीय विहार मेट्रो स्टेशनच्या रस्त्यालगत जाणार्या हरेश रामचंदानी (58) यांना स्कूटी चालक महिलेने धडक दिली. या प्रकरणी कीर्ती मेहरा हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत रामचंदानी यांच्या उजव्या हाताच्या मनगटाचे हाड फॅक्चर झाले आहे. मेहरा यांच्या विरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खारघर शहरात काही दिवसापूर्वी उत्सव चौकात दुचाकी ओव्हरटेक करताना किरकोळ कारणामुळे झालेल्या वादात एकाच मृत्यू झाला होता.