। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गुजरातला केलेल्या मदतीप्रमाणे महाराष्ट्राला मदत मिळाली नसल्याच्या प्रश्नावर कपिल पाटील म्हणाले, वादळ, दरड दुर्घटनेत केंद्र सरकारची मदत असणारी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून 1 हजार 500 कोटी देण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी मयतांना दोन लाखांची मदत देखील जाहीर केली. त्याचप्रमाणे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सर्वात आधि आम्ही काय देऊ शकतो ते बघतो. आम्ही केंद्राकडून काही मागणार नाही. अशा प्रकारे त्यांनी भाष्य केले होते. राज्य सरकारने मागणी केली की नाही ते माहीत नाही. पण केंद्र सरकारचे पथक पहाणीसाठी येते. ते बघतात अहवाल दिल्यानंतर केंद्राची मदत जाहीर होते. राज्य सरकारने मदत मागीतली तर निश्चीत केली जाईल. त्यावेळी कोणाचे सरकार आहे हे न पाहता राज्य सरकारने मागणी केली असेल तर मदत दिली जाईल. अशा प्रकारे वक्तव्य केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या आशिर्वाद यात्रेच्या सुरुवातील तुषार अतिथी गृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, आमदार पाटील आदी उपस्थित होते. महागाईच्या प्रश्नावर बोलताना आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे दर वाढले की कच्च्या तेलाच्या बॅरलेचे भाव वाढले की पेट्रोलच्या किंमती वाढतात. राज्य सरकार बोंबलत असते की महागाई वाढली म्हणून महागाई कमी करावी असे राज्य सरकारला वाटत असेल तर त्यांनी सर्वात आधी 35 टक्के कर कमी करण्यासाठी सर्वात आधी पावले उचलावीत असा सल्ला कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. ओबीसी आरक्षण, दरडग्रस्तांचे पुर्नवसन, अशा अनेक प्रश्नांवर कपिल पाटील यांनी भाष्य करताना गोल गोलच उत्तर दिल्याने पत्रकारांचा भ्रमनिरास झाला.