पूरग्रस्त गरजवंतांच्या घरोघरी पोहोचवली मदत

कोकण रहिवासी संघटनेचा पुढाकार; डॉक्टरांची टीम घेऊन केले रुग्णांवर उपचार
| खेड । प्रतिनिधी ।
कोकण रहिवासी संघटना दिवा येथील पदाधिकारी व रहिवाशांनी चिपळूण येथे आलेल्या महापुरातील पूरग्रस्त झालेल्या लोकांसाठी मदत करण्यासाठी धाव घेतली. चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी अनेक ठिकाणांहून मदत येत असली तरी ती अपुरी आहे. मात्र, ही मदत अनेक गरजवंतांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत होत्या, त्यामुळे दिवा येथील रहिवाशांनी गरजवंतांच्या घरापर्यंत मदत पुरविण्याचा निर्णय घेत, ती गरजूंपर्यंत पोहोचविली. खेड येथील पोसरे चिपळूण येथील खेर्डी माळे वाडी पेठमाप येथील भोईवाडी तसेच चिपळूण येथील पत्रकार बांधव यांच्याकडे प्रत्यक्षात जाऊन येथील गरजवंतांना मदत पुरविली. यांच्या मदतीमुळे लोक भारावून गेले. चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदतकार्य घेऊन जाणार्‍या मोहिमेत ठाणे जिल्हा महानगरी टाइम्स व पोलीस नजर या वृत्तपत्राचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी तसेच मंडणगड तालुक्यातील म्हाप्रल गावचे सुपुत्र पत्रकार गणेश गायकवाड यांचे काम उल्लेखनीय होते. तसेच पोसरे गावी आलेले ठाण्याच्या मा. उपमहापौर पल्लवी कदम यांनी कोकण रहिवासी संघटना दिवा या मंडळाचे विशेष कौतुक केले. चिपळूण पेठ माप येथील नगरसेविका यांनीही मंडळच्या या उपक्रमाचे आभार मानले, तसेच चिपळूणच्या पत्रकार बांधवांनी संघटनेचे आभार मानले.

या उपक्रमात कोकण रहिवासी संघटना (दिवा) अध्यक्ष योगेश कारांडे, उपसचिव राजेश लाखन, खजिनदार अजित चव्हाण, उपखजिनदार प्रवीण घाग, हिशोब तपासणी कृष्णा खांदारे, उपसल्लागार महेंद्र नारकर, संपर्क प्रमुख संदेश शिंदे, संघटक महेंद्र शिंदे, अमोल सिगम, सभासद सदानंद सावंत, महेंद्र म्हाब्दी, संतोष आडवडे, पुंडलिक बामणे, अंकुश कडू, भरत कदम, पालांडे, डॉ. पराग जोशी, डॉ. स्वप्नील वाहणे, खेडचे पत्रकार अजित जाधव आदी मंडळी सहभागी झाली होती.

Exit mobile version