। उरण । वार्ताहर ।
जे.एन.पी.टी हद्दीत दि. 25 एप्रिल रोजी झालेल्या अपघातात नंदु राजाराम पाटील, रा. रावे-पेण यांचे निधन झाले होते. घरातील कर्ता मयत झाल्याने पाटील कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले होते. माजी आ. भोईर यांनी सदर ट्रेलर मालका व पाटील कुटुंबातील सदस्यांसमवेत चर्चा करून पाटील कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचे आश्वासीत केले होते. 9 मे रोजी त्याच्या पत्नीला रु.2.50 लाखा रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी विकास म्हात्रे उपस्थित होते.