| उरण | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा उरण तालुक्याला ही मोठ्या प्रमाणात बसला. त्याची झळ उरणमधील ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या द्रोणागिरी पर्वतालासुद्धा बसली. मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव बेघर झाले. या आदिवासी बांधवांची सध्या राहण्याची सोय डाऊरनगर येथील जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये करण्यात आलेली आहे. या बांधवांचे दुःख दूर करण्याच्या व मदतीचा हात पुढे करण्याच्या अनुषंगाने शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट उरण पुढे सरसावली.
शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आदिवासी बांधवांना अन्नवाटप करण्यात आले. यावेळी शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. आकांशा ठाकूर, उपाध्यक्षा ॲड. अंतरा पडते, खजिनदार ॲड. वैभव म्हात्रे, सचिव ॲड. चेतन लोखंडे, कायदेशीर सल्लागार ॲड. वैजयंती म्हात्रे, सदस्य निलेश कांबळे, शुभांगी थळी, नितीन घरत (बद्री)उपस्थित होते.