| उरण | वार्ताहर |
चिरनेर गावातील स्मशानभूमी परिसराचे सुशोभिकरण व रंगरंगोटीचे काम नवीमुंबई परिसरातील पी.पी.खारपाटील कंपनी तसेच पी.पी.खारपाटील चॅरिटेबल ट्रस्टचेे संस्थापक अध्यक्ष पी.पी.खारपाटील व राजाशेठ खारपाटील या दाम्पत्यानी स्वखर्चाने हाती घेतले आहे. चिरनेर येथील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. पी.पी.खारपाटील व राजाशेठ खारपाटील या दांपत्यानी स्वखर्चाने पाच वर्षांपूर्वी हाती घेऊन आपले काका कै.गोटुराम धाकू खारपाटील यांच्या नावाने सदर स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला होता.