महामार्गावरील दुभाजकांवर गवतांचे साम्राज्य

अपघात घडण्याची भीती; वाहनचालक त्रस्त

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक नवी आणि गंभीर समस्या समोर आली आहे. या महामार्गाच्या दुभाजकांवर मोठ्या प्रमाणावर गवत, झुडपे आणि झाडी वाढली असल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवतांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. या वाढलेल्या झाडीमुळे विशेषतः रात्रीच्या वेळी आणि तीव्र वळणांवर प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांच्या दिव्यांचा प्रकाश आणि दुभाजकांवरील झाडीमुळे रस्ता स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे भीषण अपघाची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबई-गोवा महामागाचे काम गेल्या 17 वर्षांपासून सुरू असल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरत आहे. या मार्गावरील रस्त्याची काही ठिकाणी अत्यंत दयनिय अवस्था झाली असून, अपघांच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता मुंबई-गोवा महामार्गावरील दुभाजकांवर उगवलेल्या गवत व वनस्पतींची पावसाळ्यानंतर छाटणी न केल्यामुळे हे गवत अत्यंत उंच वाढले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणारी वाहने, वळणांवर समोरून येणारी वाहतूक किंवा अचानक रस्ता ओलांडणारे प्राणी व नागरिक वाहनचालकांना दिसत नाहीत. परिणामी, अचानक ब्रेक दाबावा लागल्याने किंवा अंदाज न आल्याने अपघात घडण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, या वाढलेल्या झाडीमुळे विशेषतः रात्रीच्या वेळी आणि तीव्र वळणांवर प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांच्या दिव्यांचा प्रकाश आणि दुभाजकांवरील झाडीमुळे रस्ता स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे स्थानिकांसह नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात असून, प्रशासनाने हे गवत व झाडी तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने लवकर हे काम पूर्ण करून महामार्गावरील प्रवास सुरक्षित करावा, अशी अपेक्षा आता वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

आम्ही काही दिवसांपूर्वी पाहणी केली आहे. पाऊस थांबल्यावर हे सर्व गवत व झाडी काढून साफसफाई करण्यात येणार होती. आता पाऊस गेल्याने हे काम सुरु केले असून, लवकरच पूर्ण करण्यात येईल.

रवींद्र इंगोळे,
प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
Exit mobile version