| मुंबई | वृत्तसंस्था |
आर्मी मार्कमनशिप युनिटच्या हिमांशू तलान याने लक्ष्य करंडक 2023 नेमबाजी स्पर्धेत वरिष्ठ गटाचे विजेतेपद मिळवले. ही स्पर्धा पनवेल येथील कर्नाळा स्पोर्टस अकादमी येथे पार पडली. तलान याने 251.2 गुण मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने विजेतेपद मिळवताना महाराष्ट्राच्या मोहित गोवडा (249.0) याला मागे टाकले. अंतिम शर्यतीत तलानची सुरुवात फार सावध होती. तो पहिल्या पाच शॉटमध्ये अव्वल तिघांमध्येही नव्हता. मात्र, पाच सेटच्या दुसर्या शॉटमध्ये त्याने दुसर्या क्रमांकावर मुसंडी मारली. पहिल्या एलिमिनेशन राऊंडमध्ये पहिले स्थान मिळवले. त्याने 16 आणि 17 व्या शॉटमध्ये अचूक 10 गुणांची कमाई केली. या लक्ष्य करंडक स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या तलानने विजेतेपदाच्या दीड लाख बक्षिसाची कमाई केली.
निकाल वरिष्ठ विभाग सुवर्ण : हिमांशू तलान (आर्मी) 251.2 रौप्य : मोहित गोवडा (महाराष्ट्र) 249.0 कांस्य : गुरजंत सिंग (आर्मी) 228.2) कनिष्ठ विभाग सुवर्ण : ओजस्वी ठाकूर (पंजाब) 252.0 रौप्य : तलवाल सिंग (हरियाना) 251.5 कांस्य : अजय मलिक (नौदन) 229.8







