जेएसएम महाविद्यालयात हिंदी दिवस

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग शहारातील जेएसएम महाविद्यालयात हिंदी विभाग व भाषा अभ्यास मंडळाच्या वतीने बुधवारी (दि.14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. कार्यक्रमासाठी नीलकंठ शेरे, प्रकाश दातार, हिंदी विभाग प्रमुख मोहसिन अली खान, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक जयेश महात्रे, प्रा. आय.पी.कोकणे तसेच विविध प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित राहिले.

या दिवसाचे औचित्य साधून कथालेखन, कविता लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातील हिंदी भाषेविषयी अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अस्मिता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मधुरा कदम यांनी केले.

Exit mobile version