हिंदूहृदयसम्राट शिवसेना चषकावर वायुसुत ओढागीचे वर्चस्व

| पाली/गोमाशी | वार्ताहर |
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त शिवसेना सुधागड (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड संपर्कप्रमुख विष्णू पाटील पुरस्कृत रायगड जिल्हा व सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पेण विधानसभा क्षेत्रातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. 29 रोजी क्रीडा संकुल पाली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील 32 संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील अंतिम लढत वायुसुत ओढागी विरुद्ध भैरीनाथ वावे या संघात या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी वायुसुत क्रीडा मंडळ ओढागी हा संघ ठरला.

या संघास रोख रक्कम 25 हजार 555 रु. व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांक मानकरी भैरीनाथ क्रीडा मंडळ वावे या संघास रोख रक्कम 21 हजार 111 रु व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक बापदेव क्रीडा मंडळ वणी संघास रक्कम 15 हजार 555 रु. व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमाक स्वयंभू हनुमान क्रीडा मंडळ चिवे या संघास रोख रक्कम 15 हजार 555 रु व आकर्षक चषक देऊन शिवसेना सुधागड (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने गौरविण्यात आले. या स्पर्धेतील मालिकावीर खेळाडू जितेश पाटील (ओढागी), तर उत्कृष्ट चढाईदार विशाल मस्के (वावे), पक्कड शुभम दळवी (चिवे), पब्लिक हिरो सौरभ खामगावकर (वणी) या खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version