| रोहा | प्रतिनिधी |
दिवाळीनिमित्त प्रत्येक हिंदू धर्मीय बांधवांच्या घरी चविष्ट फराळ तयार केला जातो. हे फराळ खाण्यासाठी मुस्लिम समाज बांधवदेखील उत्सुक असतात. या फराळचा मुस्लिम समाज बांधवांनीदेखील आस्वाद घेतला पाहिजे या अनुषंगाने माजी नगराध्यक्ष समीर शेडगे व उद्योजक सचिन शेडगे या बंधूंच्यावतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही मोरे आळी येथे गुरुवारी सायंकाळी भाऊबीजेच्या दिवशी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन दिसून आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून समीर शेडगे, सचिन शेडगे आणि युवती कार्यकर्त्या वनश्री शेडगे यांनी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत व सन्मान केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर, राजू जैन, अहमद दर्जी, मुस्लिम समाज माजी अध्यक्ष महमद डबीर, अष्टमी मुस्लिम समाज अध्यक्ष शफी पानसरे, रोहा वरचा मोहल्ला अध्यक्ष अलीम मुमेरे, समीर दर्जी, जुबेर चोगले, जलील तुपके, अ. कादीर रोगे, मुशीर दर्जी, इरफान दर्जी, फरहान खामकर, मजीद पठाण, मन्सूर कचकोल, मन्सूर दर्जी, मजहर सिद्दीक, समीर दाखवे, बिलाल मोरबेकर, इस्माईल रोहेकर, आदित्य कोंडाळकर, इलियास डबीर, कमाल मुल्ला, याकूब शेख, सउद सिद्दीक आदी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







