पनवेलमधील तलावाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमा – प्रीतम म्हात्रे

| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक तलाव येथे सुरक्षारक्षक नेमून सुरक्षतेचे साहित्य पुरविण्याची मागणी पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनते प्रीतम म्हात्रे यांनी आयुक्ताकडे केली आहे.

महानगरपालिका हद्दीतील असणारे तलाव येथे अनेक नागरिक येत असतात. लहान मुले पाण्यात पोहण्यासाठी तलावात उतरतात. काहीवेळा पोहता न-आल्यामुळे अनेक मुलांना आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पालिका हद्दीतील तलावांमध्ये सुरक्षिततेचे साहित्य नसल्याने बचाव कार्य करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तसेच जिवित हानीच्या दुर्घटना होऊ नये या करीता पालिकेच्या प्रत्येक तलाव येथे सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे. गणेशोत्सवास अवघे काही दिवस उरले आहेत. अनेक नागरीक गणपती विसर्जनासाठी जवळच्या तलावात जात असतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून सुरक्षिततेचे साहित्य पालिका क्षेत्रातील प्रत्येक तलाव येथे पुरविणे गरजेचे आहे. त्यामुले पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक तलाव येथे सुरक्षारक्षक नेमून सुरक्षतेचे साहित्य पुरविण्याची मागणी पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेता प्रीतम म्हात्रे यानी आयुक्ताकड़े केली आहे.

Exit mobile version