शस्त्र प्रदर्शनातून इतिहासाची माहिती

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुका सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी (दि.19) फेब्रुवारी रोजी क्षत्रिय मराठा भवन माणगाव याठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती देण्यात आली.

शिवजीयंतीच्या पावन पर्वानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम व अद्वितीय युद्ध कौशल्याची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचा उद्देशाने सकल मराठा समाज माणगाव तालुका यांच्यावतीने ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन क्षत्रिय मराठा भवन माणगाव याठिकाणी भरविण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये शिवकालीन तलवार, ढाल, भाला, कट्यार, नाणी तसेच विविध ऐतिहासिक शस्त्रांची माहिती तज्ञ्‌‍ मार्गदर्शकांमार्फत विद्यार्थी, शिक्षक व शिवप्रेमी नागरिकांना देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान व इतिहासाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या स्तुत्य उपक्रमाचा आयोजकांचा हेतू होता. सकल मराठा समाज बांधवानी शिवजयंतीच्या आदल्या दिवशी किल्ले रायगड येथे जाऊन तेथून शिवज्योत घेऊन ती शिवज्योत क्षत्रिय मराठा भवन माणगाव येथे आणली. शिवजयंतीच्या दिवशी सकाळी आयोजकांनी माणगावात शोभा यात्रा काढली. या शोभा यात्रेत सकल मराठा समाज बांधव – भगिनी यांच्याबरोबरच कामेरकर स्कुलचे विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिक सहभागी झाले होते. शिवजयंतीनिमित्त भरविण्यात आलेल्या ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाची पाहणी माणगाव शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिवप्रेमी नागरिकांनी करून सकल मराठा समाजाने एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे आयोजन केल्याने त्यांचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमास माणगाव तालुक्याचे प्रांताधिकाईर डॉ.संदीपान सानप, कुंडलिक पुरंदरे, गणेश चव्हाण, बीजाक्षी रॉय, शुभम पोल आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version