सायली कलाकेंद्राने जपलाय महाराजांचा इतिहास

सहा वर्षांपासून गडकिल्ले, मावळ्यांची निर्मिती
अलिबाग । सिद्धी भगत ।
दिवाळी म्हटले की जसे फराळ आले, तसेच किल्लेही आलेच. दिवाळी आणि किल्ला यांचे समीकरण वर्षानुवर्षे चालत आलेय. किल्ला तयार झाल्यावर त्याच्यावर ठेवण्यासाठी मावळेही आलेच. गडकिल्ले आणि मावळ्यांची निर्मिती करत शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचे काम अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील सायली कलाकेंद्राने केले आहे. गेली सहा वर्षांपासून महेश घरत व मनाली घरत या दाम्पत्यास रोजगाराची नवी वाट गवसली आहे.
सध्याच्या डिजिटल व रेडिमेडच्या युगात पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) पासून किल्ले व मावळे बनवले जातात व बाजारात विक्रीसाठी आणले जातात. अलिबाग तालुक्यातील नेहुली गावात सायली कलाकेंद्र गेल्या सहा वर्षांपासून पीओपीपासून मावळे वा किल्ले बनवण्याचे काम करत आहेत. महेश घरत व मनाली घरत हे दाम्पत्य दिवाळी सणाच्या एक महिना आधीपासून पीओपीचे साच्यातील किल्ले व मावळे बनवण्याच्या तयारीला लागतात. दोन दिवस हे मावळे व किल्ले सुकण्यासाठी ठेवून त्यानंतर त्या पांढर्‍या मूर्तींना रंगीबेरंगी फ्लोरोसीन कलर दिला जातो.

हजारो मावळे सज्ज
सायली कलाकेंद्रात ऑरडरप्रमाणे किल्ले व मावळे बनवले जातात. दरवर्षी किमान दोन हजार मावळे व 25 ते 30 गडकिल्ल्यांची निर्मिती केली जाते. साधारण दिवाळीला दहा दिवस असताना किल्ले व मावळे बाजारात विक्रीसाठी पाठवले जातात. अधिक माहितीसाठी 9823915295 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

सायली कलाकेंद्र सुरू होऊन साधारण 15 वर्षे झाली. दिवाळीसाठी मावळे व किल्ले बनवायला आम्ही मागील सहा वर्षांपासून सुरूवात केली. सुरूवातीला धीमा प्रतिसाद मिळाला; परंतु जस जशी कलाकेंद्राची ख्याती वाढत गेली, तस तसा उत्तम प्रतिसाद मिळायला सुरूवात झाली.
महेश घरत, सायली कलाकेंद्र

Exit mobile version