जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

मुरुडमध्ये ध्वजवंदन उत्साहात

| आगरदांडा | प्रतिनिधी |
महाराष्ट्र दिनानिमित्त मुरुड जंजिरा नगरपरिषद कार्यालयातील प्रांगणातील राजे शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्यास मुख्याधिकारी-पंकज भुसे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सकाळी सात वाजता प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर महाराष्ट्राची धून वाजविण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्षा-स्नेहा पाटील, माजी उपनगराध्यक्षा नौसिन दरोगे, माजी नगरसेवक विश्‍वास चव्हाण, अविनाश दांडेकर, युगा ठाकूर, प्रमोद भायदे, पांडुरंग आरेकर, अनुजा दांडेकर, परेश कुंभार, राकेश पाटील, प्रशांत दिवेकर, विजय सुर्वे, गोपाळ चव्हाण, नंदकिशोर आंबेतकर, सतेज निमकर, सुदेश माळी, रूपेश भाटकर, जयेश चोडणेकर, अभिजित कारभारी, नौनिता कर्णिक, अभिजित मुरुडकर, दिपक शिंदे,स्वप्नजा विरुकुड, स्मिता मुरुडकर, आदेश दांडेकर, डोंगरीकर मॅडम, प्रणाली शिंदे, श्रावणी भायदे आदींसह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

कळंबोली तिरंग्याला मानवंदना

| पनवेल | प्रतिनिधी |
कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते कळंबोली, नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात आले. या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, विशेष पोलीस महानिरिक्षक कोकण परिक्षेत्र प्रविण पवार, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर आयुक्त किशन जावळे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलीस सहआयुक्त संजय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस विभागात विविध ठिकाणी 24 वर्षे सेवेचा उत्तम अभिलेख राखलेले पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शंकरराव नाळे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल, नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय भिका चच्हाण यांना नक्षलवाद्यांना एन्काऊंटरमध्ये मारणे, जळगांव येथील दंगलीमधील गुन्हयांचा उत्कृष्ट तपास करणे अशा विविध उल्लेखनीय कामांबद्दल तसेच नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश हंबीरराव पाटील, पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश गोपाळ खांडेकर, एपीएमसी पोलीस ठाण्याचे पो.ह. जगदिश सुरेश पाटील, नवी मुंबई विशेष शाखेचे पो.ह.महेश पंढरीनाथ वायकर, तळोजा पोलीस ठाण्याचे पो.ह. विजय भागवत पाटील, गव्हाणफाटा वाहतूक शाखेचे पो.ह. लक्ष्मण श्रीरंग पवार, नवी मुंबई गुन्हे शाखेचे पो.ह. भानुदास बिरु मोटे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


श्रीवर्धन येथे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे यांनी नगर परिषदेच्या आवारात ध्वजारोहण केले. यावेळी पोलिसांनी ध्वजाला मानवंदना दिली.


रेवदंडा ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजारोहण सरपंच मनिषा चुनेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

रातवड विद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार

| माणगाव | प्रतिनिधी |


महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील शिक्षक मनोहर पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्ताने इयत्ता आठवी एमएनएस परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी व इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक महादेव जाधव व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. ध्वजारोहण कार्यक्रमास रातवडच्या सरपंच सुनंदा गायकवाड, उपसरपंच सतीश पवार, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

महाराष्ट्राशिवाय भारताचा इतिहास अपुरा : आ. पाटील

। पेण । प्रतिनिधी |
पेण तहसिल कार्यालय येथील ध्वजरोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर कृषीवलशी बोलताना नागरिकांना शुभेच्छा देताना, आ. रविशेठ पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्राशिवाय देशाचा इतिहास अपुरा आहे. भारत स्वातंत्र होण्यामागे महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे, 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला. परंतु त्यासाठी 107 हुतात्म्याने आपले रक्त सांडविले. 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा होत असताना, कामगार दिन म्हणूनदेखील साजरा केला जातो.


पेण तहसिल कार्यालय येथे आ. रविशेठ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसिलदार प्रसाद कालेकर, नायब तहसिलदार नितिन परदेशी, नायब तहसिलदार सुरेश थळे, पेण न.पा.मुख्याधिकारी जिवन पाटील, माजी नगराध्यक्ष संतोष श्रृंगारपुरे, माजी नगरसेवक पांडुरंग जाधव, नगरसेविका प्रतिभा जाधव, नगरसेवक शोमेर पेणकर, अ‍ॅड. तेजस्विनी नेने, शेहनाज मुजावर, संतोष पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पेण प्रायव्हेट हायस्कूल शिक्षकवृंदाने राष्ट्रगीत व राज्यगीत गायन केले. तर पेण नगरपालिकेत मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तर नगरपालिकेच्या शाळांच्या शिक्षकांनी राष्ट्रगीत व राज्यगीत गायले.

पेण शहरात व तालुका परिसरात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम साजरे झाले. त्याचप्रमाणे पेण तालुका पंचायत समिती, एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक कार्यालय, तालुक्यातील ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, बँका, पतपेढ्या आदि विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्येे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्याहस्ते ध्वजारोहण

| रसायनी | वार्ताहर |


रसायनी पोलिस ठाण्याच्या आवारात प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ बप्पाजी खेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणत ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी रसायनी पोलिस कर्मचारी व परिसरातील पोलिस पाटील उपस्थित होते.

कर्जतमध्ये कामगारांचा सन्मान

| कर्जत | प्रतिनिधी |
कामगार दिनाचे औचित्य साधत कर्जत भाजपच्यावतीने कामगारांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधून कामगार बंधू-भागिनींचा सन्मान करण्यात आला.


पोलिस मैदान येथील कामगार नाक्यावर सुनील गोगटे, दिनेश सोलंकी, समीर सोहनी, स्नेहा गोगटे, बिराज पाटकर, सर्वेश गोगटे यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचा सन्मान करण्यात आला. कामगारांचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी भाजपचे आभार मानले.

Exit mobile version