होळी चषक क्रिकेट स्पर्धा

वैदही इंटरप्राईजेस अंतिम विजेता

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

श्री सोमजाई प्रसन्न गोवेतर्फे होळी चषक पर्व 2 चे आयोजन (दि.24) ते (दि.25) मार्च रोजी करण्यात आले होते. या रोमहर्षक झालेल्या अंतिम स्पर्धेत वैदही इंटरप्राजेस संघ मालक संदीप जाधव यांचा संघ प्रथम क्रमांकाचा विजयी संघ ठरला. तर ॐ पार्थ इलेव्हन गोवे संघ मालक नितीन जाधव यांचा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरला.

या स्पर्धेत विवेक पवार याला उत्कृष्ट मालिकावीर सायकल व चषक, शुभंम वारकर उत्कृष्ट फालंदाज, विनय दहिंबेकर उत्कृष्ट गोलंदाज, संदीप जाधव उत्कृष्ट यष्टीरक्षक, पांडुरंग जाधव उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.

दोन दिवस चाललेली सर्व क्रिकेट स्पर्धा अटीतटीची झाली. यावेळी गावाकमेटी अध्यक्ष नामदेव जाधव, कमलाकर शिर्के, संदीप जाधव, नितीन जाधव, मंदार जाधव, भीमराज कापसे, स्वप्नील सानप, भरत जाधव, शांताराम पवार, मनोहर मांजरे, दिपक जाधव, लीलाधर दहिंबेकर, महेंद्र जाधव, नितीन वारकर, रामचंद्र कापसे, महेंद्र मांजरे, नंदा जाधव, पांडुरंग वारकर, नंदा वाफिलकर, अनंत पवार, रविंद्र जाधव, पांडुरंग जाधव यांच्या सहित असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन निलेश जाधव, अमित घरट, निखिल वाफिलकर यांनी केले. स्पर्धा यशस्वीकरण्यासाठी शरद वारकर, ललित जाधव, राजेंद्र जाधव, कल्पेश सुर्वे, सर्व संघ मालक सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली

Exit mobile version