बाजारात होळीची लगबग सुरू

नैसर्गिक रंगांनी बाजारपेठा फुलल्या
विविध प्रकारच्या पिचकर्‍यां विक्रीसाठी

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
वाशीतील घाऊक बाजारात विविध प्रकारचे नैसर्गिक रंग ,लहानग्यांचे आकर्षण असणार्‍या विविध प्रकारच्या पिचकर्‍यांनी बाजारपेठ फुलली आहे. याच्या खरेदीला ग्राहकांची व लहानग्यांची खरेदी सुरू झाली आहे. येथील बाजारपेठत नवी मुंबईसह मुंबई उपनगरातील ग्राहक घाऊक दरात वस्तू मिळत असल्याने जादा ग्राहक खरेदीला येत असतात. बाजारात भारतीय बनावटी साहित्य उपलब्ध असून मागील वर्षी पेक्षा यंदा दर 15 टक्के ते 20 टक्के कमी असल्याचे मत व्यापारी यांनी व्यक्त केली आहे. नैसर्गिक रंगाला अधिक मागणी करण्यात येत आहे. नैसर्गिक रंग 20 रु ते 250 रु तर रंग 150-200 रुपयांवर उपलब्ध आहेत. तसेच यंदा बाजारात कलर ब्लास्टर , सिलेंडर स्प्रे रंग ही उपलब्ध असून 900, 1250 ते 1700रुपयांनी उपलब्ध आहे.

कार्टून पिचकारीला मागणी
बाजारात विविध प्रकारच्या पिचकार्‍या उपलब्ध असून यामध्ये विविध कार्टून्सच्या पिचकार्‍याची क्रेज लहान मुलांमध्ये असते. पबजी या खेळाची पिचकारी उपलब्ध असून लहानग्यांमध्ये याची क्रेज पहावयास मिळत आहेत. यंदा आवाज येणार पिचकारी 250रुपयांनी उपलब्ध आहे. विविध डिझाईनच्या पिचकारी 40 रु ते 650 रुपयांवर तर पबजी पिचकारी 250 रु ते 500रुपयांवर उपलब्ध आहेत.

सध्या बाजारात होळीनिमित्त रंग, पिचकारी खरेदीला ग्राहकांनची लगबग सुरू असून ग्राहक नैसर्गिक रंगाला अधिक पसंती देत आहेत.त्याचबरोबर लहान मुलांमध्ये कार्टून मागणी करीत असतात. – विक्रेते

Exit mobile version