। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईसह उपनगरांमध्ये आणि लगतच्या ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अशातच आता हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाचा जोर कायम; सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
