| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत असून हवामान खात्याने रेड अलर्ट घोषित केला असून जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्याकडून बुधवार दि.26 रोजी सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.