। अलिबाग । प्रतिनिधी ।
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या ‘प्रभाविष्कार’ अंतर्गत होली चाईल्ड सी.बी.एस.इ. शाळेचा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून सीआयएसएफ डेप्युटी कमांडर आरसीएफ थळचे संदीप चक्रवर्ती, संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, डॉ. प्रणाली पाटील, विविध ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांसह होली चाईल्ड सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका वेणी वेल्लईम्मल्ल, उपमुख्याध्यापिका सदाफ शाहबाजकर, कॉलेजचे इतर प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्य कार्यालयाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारचे सादरीकरण केले.