लता मंगेशकरांना राज्यसभेत श्रद्धांजली

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राज्यसभेमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. राज्यसभेच्या सदस्यांनी  एक मिनीट उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्यसभेचे सभापती एम व्यंकया नायडू  यांनी गायिका आणि सभागृहाच्या माजी सदस्या लता मंगेशकर यांच्या मृत्यूबद्दल शोकप्रस्ताव सादर केला. कामकाज सुरु होण्याआधीच त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच त्यानंतर एका तासासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. 
 

अस्थिंचे संकलन
गान कोकिळा लता मंगेशकर यांचा पुतण्या आदिनाथ याने सोमवारी मुंबईच्या शिवाजी पार्कमधून त्यांच्या अस्थि गोळा केल्या, मआम्ही अस्थिकलश लता दीदींचा भाऊ आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचा मुलगा आदिनाथ यांच्याकडे सुपूर्द केला आहे. असे सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. अस्थिकलशाचे विसर्जन कुठे होणार याबाबत कुटुंबाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.फ

लतादीदींचे टपाल तिकीट
गानसम्राज्ञी लता मंगेशकर  यांच्या सन्मानार्थ भारत सरकार टपाल तिकीट जारी करणार आहे. केंद्रीय मंत्री अश्‍विनी वैष्णव   यांनी एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ही माहिती दिली.

Exit mobile version