। नवी दिल्ली । । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून, लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली – शरद पवार, ज्येष्ठ राजकारणी