वाहन चोरीसह घरफोडी करणारा गुन्हेगार गजाआड

पनवेल । वार्ताहर ।
वाहन चोरीसह घरफोडी करण्या-या सराईत गुन्हेगारास न्हावाशेवा पोलीसांनी गजाआड केले असून त्याच्याकडून 9 गुन्ह्यांचा 3 लाख 31 हजार 469 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिसरातून मोठ्या प्रमाणावर मोटर सायकल, टेम्पो व इतर वाहने चोरीच्या घटना घडत असल्याने, चोरीच्या घटनांचा प्रतिबंद व्हावा तसेच चोरीच्या घटनेतील आरोपीत यांचा शोध घेवुन कायदेशीर कारवाई करणेबाबत पोलीस आयुक्त नवी मुंबई बिपीन कुमार सिंह, यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे कार्यवाही चालु होती.

त्याअंतर्गत न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीतुन सोनारीगाव येथुन महिंन्दा कंपनीची बोलेरो पिकअप टैम्पो क्र. चक-46-ए-9271 ही चोरी झाल्याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर गुन्हयाबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार वपोनि मधुकर भटे यांनी एक पथक स्थापन केले. सदर पथकाने पोलीस ठाणे हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तपासुन व आरोपीत याचेबाबत गोपनिय माहिती प्राप्त करून तसेच गुन्हयाचा तांत्रीक तपास करून गुन्हयातील आरोपी कौशल पाटील यास जांभुळपाडा येथुन ताब्यात घेवुन त्यास अटक केली.

अटक केलेल्या आरोपीकडे तपास पथकाने तपास केला असता न्हावाशेवा पो. ठाणे, पनवेल शहर पो. ठाणे, वडखळ पो. ठाणे हद्दीत केलेल्या नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून त्यामध्ये मोटर वाहन चोरी व घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची कारवाई मधुकर भटे, दिपक इंगोले, सुधीर निकम, , गणपत परचाके, बोराटे, भोसले, राजपुत, शिंदे, शिंदे, यांनी पुढील तपास करत आहे.

Exit mobile version