घरफोडी चोरी करणारे सराईत गुन्हेगार अटकेत

साडेतीन लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
। पनवेल । वार्ताहर ।
घरफोडी चोरी करणारे सराईत गुन्हेगाराकडून नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सुमारे 48 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व 23 मोबाइल फोन असा एकुण 3 लाख 50 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडीच्या दाखल गुन्ह्यांची उकल करण्याकरीता सपोनि गंगाधर देवडे व पथक नेमण्यात आलेले होते. सदर पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रबाळे परीसरात सापळा लावून इसम नामे शफिक अब्दुल शेख यास शिताफीने ताब्यात घेतले. सदरचा इसम हा अतिशय सराईत असल्याने त्यांचेकडे कौशल्यपुर्ण चौकशी केल्यानंतर त्याने दिघा परीसरात दिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिणे चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचा रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे, भा.द.वि. कलम 454,380 प्रमाणे दाखल गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली व गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 40 हजार रूपये किंमतीचे 48 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
तसेच सदर पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रबाळे परीसरात गूणाली तलाव सेक्टर 15 घनसोली येथे सापळा लावून मयूर दिपक रेंगे याला ताब्यात घेतले. त्यावेळी दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले त्यांचेकडे कौशल्यपुर्ण चौकशी केल्यानंतर भाग्यलक्ष्मी मोबाइल शॉपी गावदेवीवाडी घणसोली नवी मुंबई हे मोबाइलचे दूकानाचे शटर तोडून त्यातील एकूण 23 मोबाइल चोरून नेल्याचे कबुली देऊन चोरी केलेले 23 मोबाइल फोन काढून दिले सदर बाबत रबाळे पोलीस ठाणे, भा.द.वि. कलम 457, 380 प्रमाणे दाखल असल्याने त्यांना पुढील कार्यवाहीस्तव रबाळे पोलीस ठाण्याचे ताब्यात देवून गुन्ह्यात अटक केली व चोरीस गेलेले सर्व मोबाईल हस्तगत केले.

Exit mobile version