। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरासह नवी मुंबई, पुणे परिसरात घरफोडी करणारा सराईत आरोपीस गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने गजाआड करून त्याच्याकडून आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून 18 लाख 31 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
घरगुती उपकरणे विकण्याच्या बहाण्याने फिरणार्या व या दरम्यान बंद घरे हेरून घरफोडी करणार्या सराईत चोरास गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने पुण्यातून ताब्यात घेतले आहे . गजाजन पाटील (वय 28) असे त्याचे नाव असून त्याने पनवेल सह नवीमुंबई व पुण्यात आठ घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील दागिने व स्विफ्ट डिझायर गाडी असा एकूण 18 लाख 31 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोशल मीडियावरून आरोपीची माहिती मिळवून त्याद्वारे गुन्हे शाखाचे पथकाने पुणे येथे जाऊन सदर आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपी विरोधात पुणे येथील पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.