| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील शेलू गावातील तरुण मंडळाने शेलू आणि बांधिवली आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि उत्कृष्ट गणेशमूर्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून चित्रकार राजेश शिंदे आणि संजय पंडित यांनी काम पाहिले.या घरगुती गणेश सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक दर्शन मसणे तर द्वितीय क्रमांक घनश्याम निमणे आणि तृतीय क्रमांक शंकर शेकटे तसेच उत्तेजनार्थ तनया निमणे यांच्या गणेश सजावटीला देण्यात आला. तर उत्कृष्ट गणेशमूर्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गणेश तरे, द्वितीय क्रमांक श्रीकांत मसणे आणि तृतीय क्रमांक अविनाश तरे तर उत्तेजनार्थ पारितोषिक विकी बोराडे यांच्या मूर्तीने पटकावले.
सर्व विजत्यांना पारितोषिक वितरण समारंभ उल्हास नदी गणेश घाट येथे करण्यात आला. यावेळी माजी सरपंच मंगल मसणे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामदास मसणे, नंदकुमार पाटील, पांडुरंग मसणे, तुकाराम मसणे, शंकर तरे, अनंता मसणे,भगवान मसणे, वसंत तरे, कर्जत पंचायत समिती माजी सदस्य नरेश मसण, पोलीस पाटील मनोज पाटील,अरुण मसणे, अर्जुन तरे, विलास डुकरे, ॲड.सूर्यकांत मसणे, ॲड रमाकांत तरे आणि हनुमान भगत,मनोहर मसणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.







