पनवेल तालुक्यात शिक्षकांचा सन्मान

। पनवेल । वार्ताहर ।
4 के चॅनलचे संलग्न साप्ताहिक गौरव दर्शनतर्फे नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील आपल्या शाळेत उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचा स्मरणचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला बाबासाहेब चिमणे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, पनवेल महानगर पालिका, तसेच महेश खामकर, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, पनवेल, मंदार पणवेलकरसर, उद्योजक एल.आर.व्यंकटरामन, के.ए. बंठिया हायस्कूलचे प्रा. भगवान माळी, शिक्षणमहर्षी रमेश तुपे या सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्ही.व्ही पाटील, शितळकुमार शिंदे, नंदकुमार जाधव, चंद्रकांत मढवी, विलास पाटील, वैशाली जगदाळे, पंकज दिलीप भगत, सपना म्हात्रे, मनोज कडकिया, संदीप नेरकर, अनवर शेख, श्री. अंतुले या सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला एसजीटी इंटरनॅशनल स्कुल चे संस्थापक रमेश तुपे, उत्कल घाडगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसजीटी इंटरनॅशनल स्कूलचे प्रिंसिपॉल सचिन अवाले यांनी केले.

Exit mobile version