। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अजय कापसे यांचा रोहा तालुका वरिष्ठ वेतनश्रेणी गट व शिक्षकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. कापसे यांची रायगड जिल्हा शिक्षण समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची विविध प्रलंबित असलेली कामे मार्गी लागले आहेत. यात प्रामुख्याने वरिष्ठ वेतनश्रेणी, मेडिकल बिल, पदवी परवानगी, भविष्य निर्वाह निधी सह प्रकरणे व इतर कामे अतिशय जातीने लक्ष घालून जिल्हा परिषदेतून पूर्ण केले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्न संदर्भात सातत्याने मेहनत घेऊन ते काम निस्वार्थ भावनेने व प्रामाणिकपणे पूर्णत्वास घेऊन जात आहेत. त्यामुळे रोहा तालुक्यातील शिक्षक मंडळींनी कापसे यांचा सन्मान रोहा तालुका वरिष्ठ वेतनश्रेणी गट व शिक्षकांच्या वतीने करण्यात आला.