जेएसएम महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

दोन विद्यार्थिनिंची रायगड महिला क्रिकेट संघात निवड

| अलिबाग । वार्ताहर ।
खारघर येथील घरत ग्राऊंडवर शुक्रवार दि 25 रोजी रायगड जिल्हा महिला क्रिकेट संघासाठी निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीसाठी रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून एकूण 48 मूलींनी सहभाग घेतला होता. त्यामधून जेएसएम. महाविदयालयाच्या एफ.वाय.बी.एस सी या वर्गात शिकण्यार्‍या सिद्धी पाटील या विद्यार्थिनीची अंतिम संघात निवड झाली तसेच महाविद्यालयाच्या एस.वाय.बी.एस.सी या वर्गात शिकणार्‍या वेदांती पाटील या विद्याथिर्नीची 20 अंतिम खेळाडूंमध्ये निवड झाली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आंतर विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा या दोघींनी चांगला खेळ करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. याबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी सिद्धी व वेदांती यांचे अभिनंदन केले.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ड. गौतम पाटील यांनी आम्हा विद्यार्थ्याना महाविद्यालयात क्रिकेट नेट उपलब्ध करून दिले म्हणून आम्ही सराव करु शकलो व येथ पर्यंत पोहोचू शकलो. डॉ. रविंद्र चिखले व प्रशिक्षक अभिजीत तुळपुळे त्यांनी केलेल्या मार्गदर्शन आभार.

सिद्धी व वेदांती

या वर्षी प्रथमच महाविद्यालयचा मुलिंचा क्रिकेट संघ तयार करण्यात आला व त्यांनी थेट विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धेत मुसंडी मारली. त्यातील या 2 विद्यार्थिनिंची निवड रायगड जिल्हा महिला क्रिकेट संघात झाली आहे, हे आम्हाला अभिमानास्पद आहे.

अ‍ॅड. गौतम पाटील, अध्यक्ष- जनता शिक्षण मंडळ, अलिबाग.
Exit mobile version