विकास चित्ते यांचा स्नमान

। नेरळ । प्रतिनिधी ।

माउंटन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून राज्यातील गिर्यारोहकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कर्जत येथील गिर्यारोहक विकास चित्ते यांचा नवीन गिर्यारोहक घडविल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. माऊंटन स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्र या गिर्यारोहण क्षेत्रातील अग्रगण्य व नामांकित संस्थेकडून शिवशंभो युवा हायकर्स कर्जत संस्थेचे अध्यक्ष विकास चित्ते यांचा गिर्यारोहण क्षेत्रातील प्रदिर्घ कारकिर्दी बद्दल आणि कर्जत परिसरात गिर्यारोहण हा धाडसी प्रकार रुजवून अनेक गिर्यारोहक तयार केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. आयुष्यातील उमेदीचा काळ सायकलींग नंतर गिर्यारोहण, भटकंती आणि सामाजिक दृष्टी ठेवून या क्षेत्रात विकास चित्ते यांनी काम केले. दिग्गज गिर्यारोहक ते तरुण पिढीतील गिर्यारोहक यांना एकत्र आणून संवाद घडवून आणणे, या क्षेत्रातील संबंधित सर्वांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. अशी अनेक प्रेरणादायी कामे त्यांनी केली आहेत.

Exit mobile version