अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी नेल्सन मंडेला नोबेल पीस ॲवार्डने – २०२१ व मानद डॅाक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आज सायंकाळी मुंबई येथील हॅाटेल सहारा स्टार येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आला. पण त्यात पण योग असाकी, ज्या आदित्य नारायणने आपल्या अलिबागबद्दल अपशब्द वापरले होते, त्याच आदित्य नारायणला एका अलिबागकराच्या कार्याचा सन्मान करावा लागला. स्टेजवर देखील नगराध्यक्षांची त्यांच्याकडून घडलेल्या चूकीची आठवण करून दिली. त्यांवर आदित्याचे पून्हा दिलगीरी व्यक्त केली. या कार्यक्रमाला इजराइल जनरल कॅान्सुलेट कोब्बी शोशानी.
डॉ गुल क्रिपलानी – मानद कॉन्सुलेट आईसलॅन्ड, श राजकुमार तक अध्यक्ष नेल्सन मंडेला नोबेल पीस ॲवार्ड ॲकॅडमी, सिने अभिनेत्री डॉ. अदिती गोवित्रीकर, संगीतकार अन्नु मलिक, उत्तरप्रदेश आमदार श्री. ब्रिजभूषण राजपूत, गायिका महालक्ष्मी अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.
![](http://krushival.in/grygrars/2021/10/WhatsApp-Image-2021-10-30-at-20.43.25-855x1024.jpeg)