नवजीवन मित्र मंडळच्यावतीने सत्कार

। वाघ्रण । वार्ताहर ।
नवजीवन मित्र मंडळ सातघरने सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार (2 ) सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आला. प्रास्ताविक धनंजय पाटील यानी केले. यावेळी ज्येेष्ठ नागरीक, सेवानिवृत कर्मचारी, कला, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी तसेच वाघ्रण येथील पत्रकार दिपक पाटील यांना यंदाचा जिल्हा परीषदेचा रायगड भूषण पुरस्कार प्रदान झाल्या बदल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाळकृष्ण पाटील, प्रकाश पाटील, नारायण म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले. धनंजय पाटील,गजेंद्र म्हाञे, स्वप्नील पाटील, चंद्रकात म्हात्रे, जगदिश पाटील, जयदीप पाटील, संदीप पाटील आदीनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. यावेळी नारायण म्हात्रे, अनंत पाटील, बाळकृष्ण पाटील, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version