उंबर्डे सरपंच आदर्श पुरस्काराने सन्मानित

| हमरापूर | वार्ताहर |

पेण तालुक्यातील उंबर्डे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यतर्फे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे, प्रियदर्शनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुजाता कासार, मानव अधिकार संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पावसे, सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष रोहित पवार आदींसह त्यांचे हितचिंतक लक्ष्मण पाटील, रामभाऊ ठाकूर गुरुजी, उद्योजक मनोज पाटील, विजय भोईर, मुकेश पाटील, विश्‍वनाथ माळी, वसंत म्हात्रे, कल्पेश मोकळ, तसेच सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाबासाहेब पावसे यांनी राज्यातील सरपंच खरोखरच चांगले काम करत असून, त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच हा आजचा हा सत्कार समारंभ आयोजित केल्याचे सांगितले. सरपंचाच्या कार्याचे कौतुक करण्याचा हेतू संघटनेचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर, इतर मान्यवरांनीदेखील यावेळी आपले विचार मांडले.

Exit mobile version