अरुण जाधव यांचा सन्मान

। रसायनी । वार्ताहर ।

आपले आदर्श मुंबई फाऊंडेशन व इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स सेवा संघाच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आनंदीबाई म्हात्रे सभागृह विक्रोळी येथे नुकतेच महाराष्ट्रातील गुणवंतांचा व समाजसेवकांना ‘एक्सलन्स स्टार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी डॉ. संजय भोईर, भालचंद्र पाटे, अशोक भोईर, पूनम पाटगावे यांच्यातर्फे सामाजिक, साहित्य, शिक्षण, वैद्यकिय, उद्योग, कला, क्रीडा, सरपंच क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणार्‍या आदर्शकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुकृत खांडेकर, आरती बनसोडे, उपेंद्र सावंत, अ‍ॅड. प्रवीण गवळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

Exit mobile version