महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचा सत्कार

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल मनसे आयोजित 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी रोजी राजभाषा महोत्सवाचे आयोजन आगरी शिक्षण संस्थेचे मैदान, खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचा सत्कार ज्येष्ठ रसिक प्रेक्षकांच्या हस्ते या महोत्सवात करण्यात आला. याप्रसंगी अशोक सराफ यांनी पहिल्यांदाच असा सत्कार अनुभवल्याचे म्हटले. या आधी अनेक सत्कार झाले, पण सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांनी केलेला हा पहिलाच सत्कार. म्हणुनच तो विसरता येणार नाही, असेही ते म्हणाले.

Exit mobile version