| खांब | वार्ताहर |
शासनमान्य मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना अधिक माहिती व्हावी या उद्देशाने मंथन समुहाचे माध्यमातून गेली अनेक वर्षं हा उपक्रम राबविला जात असून या उपक्रमास संपूर्ण राज्यभरातून शिक्षक-विद्यार्थी व पालक वर्गाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभत आहे. तसेच सदरील स्पर्धा परीक्षा ही शासनमान्य असल्याने या परीक्षेला खुप महत्व प्राप्त झाले आहे.
मंथन समुहाच्या रायगड जिल्हा समन्वयक दीपाली शिंदे (रोहा) यांच्या माध्यमातून या परीक्षेसाठी रोहा आणि माणगाव या दोन्ही तालुक्यातून रोहा नगरपालिका मंगळवाडी शाळा, कोएसो मेहेंदळे हायस्कूल, डॉ.सी.डी.देशमुख कन्या शाळा, झी स्कूल जिंदाल, रिलायन्स नागोठणे, कोलाड हायस्कूल, धाटाव हायस्कूल, शिपूरकर इंग्लिश स्कूल माणगाव व दोन्ही तालुक्यातील बहुतांश प्रा.शाळा शाळांतून या परीक्षेसाठी खुप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वर्गाने सहभाग नोंदविला होता. व या परीक्षेत नैपुण्यप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मेहेंदळे हाय. प्राचार्य मोसे, नारायण पानसरे, मुख्याध्यापक दीपक लांगी, जिल्हा समन्वयक दीपाली शिंदे व अन्य शिक्षक मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.