| खांब | वार्ताहर |
रोठ खु. येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी व इ. 1 ली ते 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक श्लोक मुटके, द्वितीय क्रमांक कल्याणी वारंगे, तृतीय क्रमांक कौस्तुभ चोगले, रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक कल्याणी वारंगे, द्वितीय क्रमांक आदिती मोरे, तृतीय क्रमांक तन्वी मुटके आदी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी नितीन वारंगे, किशोर तावडे, खेळू वारंगे, ज्ञानेश्वर साळुंके, मंगेश देवकर, विलास डाके, पूजा जाधव, निर्मला नाकती, अनिल थिटे, महेश मोरे, सुमित साळुंके, उद्देश वारंगे, सूरज वारंगे, पांडुरंग देवकर आदी उपस्थित होते.