मुंबईत मुरुडच्या लेकींचा सन्मान

| कोर्लई | वार्ताहर |

मुंबईतील शिवाजी मंदिर दादर येथे कुणबी समाजोन्नती संघ, कुणबी युवा मंडळ यांच्यातर्फे झालेल्या कुणबी मेळावा 2023 निमित्त बळी पहाट कार्यक्रमात मृत वडिलांच्या देहाला अग्नी देत मुलानेच वडिलांच्या मृतदेहाला अग्नी देण्याची प्रथा मोडीत काढणाऱ्या मुरुड तालुक्यातील सावित्रीच्या लेकींचा मंगळवारी वावडुंगी-वरचीवाडी येथील बरसाली रमेश मोहिते आणि सर्वे येथील अनघा केतकी महाडिक व विहूर येथील स्वाती बोरकर, ज्योति चव्हाण (विहूर) यांचा कुणबी युवाने विशेष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच ओबीसी जनमोर्चाचे अण्णाभाऊ शेंडगे, चंद्रकांत बावकर, भूषण बरे, रुचिता बोलाडे, दिपिका आग्रे, मारुती जोशी, सुनील देवरे, डॉ. रोहिदास दुसार, रोशन पाटील, माधव कांबळे, युवराज संतोष, नारायण गोरीवले, मधुकर भुवड, चंद्रकांत डिके, किरण डिके, अशोक बामुगडे, महादेव नाईक, भावेशभुवड, मनोज डिके, रणजित पाटील, सुरज डिके, कैलास डिके, गणेश गोरीवले, विमल जाधव, संतोष सावंत, प्रदीप भेकरे, महाडीक परिवार, तसेच मुरूड तालुका समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version