वयोवृद्ध ग्रामस्थाांचा सत्कार

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील खंडाळा लोणावळा घाटात असलेल्या स्टेशन ठाकूरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला. यावेळी तेथील वयोवृद्ध ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ या स्वायत्त संस्स्थेच्या मराठी भाषा कार्यगट समिती माजी सदस्य प्रा. जयवंत पाटील तसेच कविता पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी विचारपीठावर प्रा. जयवंत पाटील, कविता पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजू मोरे, विषय शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक वेच्या गावित,पांडुरंग काळे, गणेश गंगावणे आदी उपस्थित होते. स्टेशन ठाकूरवाडी गावातील वयोवृध्द यांचा शाल देवून सत्कार करण्यात आला तर तसेच शाळेतील 42 विद्यार्थी तसेच तेथील अंगणवाडी केंद्रातील नऊ विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे कीट देण्यात आले.

Exit mobile version