शेतकर्‍यांचा बांधावर जाऊन सन्मान

मनेश कावणकर, काशिनाथ पोपेटा यांचा गौरव

| तळा | वार्ताहर |

रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकर्‍यांचा सन्मान त्यांच्याच शेताच्या बांधावर जाऊन दरवर्षी केला जातो. रायगड प्रेस क्लब तळा शाखेच्या वतीने आदर्श शेतकरी पुरस्कार मनेश कावणकर (रा. वाजळोशी) आणि काशिनाथ पोपेटा (रा. मालाठे) यांना मालाठे येथे शेताच्या बांधावर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यास तहसीलदार स्वाती पाटील, तळा प्रेस क्लब अध्यक्ष संजय रिकामे, सचिव डी.टी. आंबेगावे, सल्लागार पुरुषोत्तम मुळे, कृषी सहाय्यक अतुल बाबर, संदीप साळुंके, तहसील कार्यालय अधिकारी, कर्मचारी, सत्कारमूर्ती मनेश कावणकर, काशिनाथ पोपेटा पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तळा प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय रिकामे यांनी केले, प्रास्ताविक पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांनी केले, तर आभार संजय रिकामे यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे तहसीलदार स्वाती पाटील, कृषी सहाय्यक अतुल बाबर, संदीप साळुंके यांचे तळा प्रेस क्लब सचिव डी.टी. आंबेगावे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. मनेश कावणकर आणि काशिनाथ पोपाटे यांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले.

Exit mobile version