आदर्श मातांचा सन्मान हे अलौकिक कार्य – मेहकर

| महाड | प्रतिनिधी |
विचार, आचार, संस्कार आणि सामाजिक तळमळीतून संतोष घरटकर व अंजली घरटकर या दांपत्याचे समाजकार्य हे समाजासाठी आणि तरुण पिढीसाठी अलौकिक आणि तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार महाड येथील उद्योजक राजेश मेहकर यांनी काढले. रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशन आयोजित व युवासेना दक्षिण रायगड जिल्हा युवा अधिकारी यांच्या सौजन्याने आदर्श माता पुरस्कार सोहळा नुकताच लाडवली येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साहित्यिक माजी मुख्याध्यापक अ.वि. जंगम, ज्येष्ठ आदर्श माता इंदुमती घरटकर,विलास खोपकर, उषा खोपकर, सुनील गांधी, रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संतोष घरटकर, अंजली घरटकर, पत्रकार धनराज गोपाळ, पत्रकार चंद्रकांत पाटणे, ऑपरेटर रेखा गुंजावटे, स्मिता जोष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी आदर्श माता स्नेहल गांधी, अस्मिता बाटे, सोनल गंगथडे ,आशा आमले, अनिता कोळसकर या आदर्श मातांचा यथोचित सन्मान करण्यात आला या आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळ्याचे औचित्य साधून वी आर मोअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष पोलादपूर येथील रहिवासी व मुंबईस्थित उद्योजक विकास धनराज गोपाळ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तर प्रल्हाद ठाकूर यांना उत्कृष्ट निवेदक, सूत्रसंचालक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद ठाकूर यांनी केले.

Exit mobile version