उरण वाहतूक शाखेच्या पोलिसांचा सन्मान

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या अविरत मेहनतीची दखल घेऊन आयएसए लॉजिस्टिक्स प्रा.लि.तर्फे एका विशेष कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात आयएसए लॉजिस्टिकचे चेअरपर्सन संतोष शेट्टी, एचआर अभय वायकर व सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये आयएसए लॉजिस्टिकचे चेअरपर्सन संतोष शेट्टी यांनी उरण वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी अंमलदार अविरतपणे मेहनत घेऊन वाहतूक नियमन करून वाहतूक सुरळीत ठेवत असल्याचा उल्लेख करून, सर्व पोलीस अधिकारी अंमलदारांबद्दल गौरवोद्गार काढले.

उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी आयएसए लॉजिस्टिक्स प्रा.लि.तर्फे दिलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कार्याला सलाम केला. पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समाजासाठी दिलेल्या निःस्वार्थ सेवेला सलाम करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version