| चिरनेर | प्रतिनिधी |
नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते दि.बा. पाटील चळवळ स्पर्धेत चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या ठकुबाई परशुराम खारपाटील इंग्रजी माध्यम स्कूल, व परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक विद्यालय तसेच काळशेठ धाकू खारपाटील जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी निबंध, वकृत्व, चित्रकला व लेखन स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांचा सन्मान म्हणून प्राचार्य सुरदास राऊत आणि मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रम चिरनेर शाळेत प्राचार्य सुरदास राऊत मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे, पर्यवेक्षक आनंद चिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी स्पर्धा संस्थेचे पदाधिकारी व शाळेचे अन्य शिक्षक उपस्थित होते. लोकनेते दि.बा. पाटील चळवळ स्पर्धा हा अनोखा उपक्रम दशरथ भगत, लोकनेते दिबांचे सुपुत्र अतुल पाटील, स्पर्धा व प्रवक्ता शैलेश घाग यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आला होता. या स्पर्धेतील विजेत्यांचा आणि स्पर्धा चळवळ स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध शैक्षणिक संस्थांच्या शाळा आणि महाविद्यालयातील समर्पित शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे रवींद्र वाडकर, साहेबराव ठाणगे , विवेक भोईर, किशोर घरत, श्रीहरी पवळे, सुधाकर लाड, प्रशांत निगडे, गजानन म्हात्रे, रामनाथ म्हात्रे, तेजस पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.