गणेश स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे सागम यांच्या माध्यमातून गणेशोत्सवामध्ये विविध स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जातात. या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

कर्जत शहरातील सर्वात जुने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्याकडून शालेय विद्यार्थी यांच्यासाठी अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात. मंडळाच्या वतीने समूह गीत गायन, समर गीत गायन, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जत शहरातील सर्व शाळांचा या स्पर्धांमध्ये सहभाग होता. अभिनव ज्ञान मंदिर,शारदा मंदिर,कन्या शाळा,विद्या विकास, कर्जत इंग्लिश मीडियम, डोंबे विद्यानिकेतन या शाळांनी सहभाग घेतला होता. चित्रकला स्पर्धेत पाचवी ते सातवी पहिल्या गटामध्ये प्रथम क्रमांक रिया रमेश मोरे, तर द्वितीय क्रमांक यशस्वी माधव डोनेकर आणि तृतीय क्रमांक राधिका वर्मा हिने मिळविला. तसेच आठवी ते दहावी दुसऱ्या गटामध्ये प्रथम क्रमांक प्रतीक अशोक पालवे, द्वितीय क्रमांक मुग्धा मोरेश्वर भगत आणि तृतीय क्रमांक प्रथमेश संतोष लाड याने मिळविला. गीत गायन स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व शाळांना सन्मानचिन्ह आणि पारितोषक देण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आशिष गोखले, पंकज शहा, अभिजित मराठे, संदीप भोईर, अनिल शहा, अमित मराठे, निलेश परदेशी, योगेश लोवंशी, दत्ता खंडागळे, रघुनाथ खैरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version