आंबेडकर जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान

चंद्रकांत सोनावणे यांच्या पुढाकाराने मोफत साड्या वाटप
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे यांच्या माध्यमातून रामवाडी शिवाजी नगर येथील महिला भगिनींना मोफत साड्या वाटप करण्यात आले. यावेळी पेण तालुकाअध्यक्ष चंद्रकांत सोनावणे, सरचिटणीस सचिन कांबळे, कोषाध्यक्ष नरेश गायकवाड, महिला उपाध्यक्ष सविता सुर्वे, सचिवा रेश्मा जाधव, कार्यालयीन सचिव मंगेश कांबळे, संघटक ज्येष्ठ बौद्धाचार्य पांडुरंग जाधव, रोडे गावच्या सरपंच संगीता सोनावणे, पोलीस पाटील सुरेश सोनावणे, माजी सरपंच आद, सुलोचना सोनावणे, माजी सरपंच स्वप्निल म्हात्रे, नरेश सोनावणे, हर्षल मोरे, दुष्मी गावचे पोलीस पाटील रमेश कांबळे तसेच विजय सुर्वे, जनार्दन सोनावणे, भास्कर कांबळे, दिनेश कांबळे, संजय गायकवाड, रामदास शिंदे, भास्कर सुर्वे, सचिन सोनावणे आदी उपस्थित होते.

Exit mobile version