गणित परीक्षेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

| खांब | वार्ताहर |

रायगड गणित विज्ञान अध्यापक मंडळ व पंचायत समिती शिक्षण विभाग रोहा यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या गणित संबोध शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त व विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा रोहा येथील को.ए.सो. मेहेंदळे हायस्कूल येथे संपन्न झाला.

सदर कार्यक्रम पं.समितीच्या गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे या उपस्थित संपन्न झाला. याकार्यक्रमासाठी प्रा. रमेश मोसे रायगड गणित विज्ञान अध्यापक मंडळाचे सहसचिव तथा रोहा तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष टिळक खाडे, उपाध्यक्ष विलास जाधव तसेच पंचायत समितीच्या साधन व्यक्ती सांगिता धामणसे, मनिषा पाटील, तसेच रोहा तालुक्यातील विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भिवा कोकरे यांनी केले.

Exit mobile version